Ad will apear here
Next
स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ - ‘स्टील फ्रेम’
‘स्टील फ्रेम’ हे फारुक नाईकवाडे यांनी लिहिलेले आणि राष्ट्रचेतना प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आज स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ म्हणून सिद्ध झाले आहे. डॉ. श्रीकर परदेशी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, अभिनय कुंभार आणि इतर ११ अधिकाऱ्यांच्या यशोगाथा, त्यांच्या संघर्षकथा हा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकाची विक्रमी ६१वी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. या पुस्तकाचा हा अल्प परिचय...
.......
प्रत्येकालाच यशाची, मानमरातबाची, मोठ्या अधिकारपदाची जबरदस्त तृष्णा असते. ही तृष्णा हे यशाच्या आकर्षणाचे एक कारण असते. यशाच्या मंदिराकडे एक-एक पायरी करीतच जावे लागते. सर्व पायऱ्या पार केल्यानंतर माणूस विशिष्ट उंचीवर दिसला, की त्याचे कौतुकसोहळे सुरू होतात. यशाने डोळे दिपून गेले, की त्यांची क्षमता कमी होते की काय ठाऊक नाही. परंतु देदीप्यमान यशाचा रस्ता मात्र अनेकांना दिसत नाही हे मात्र खरे. ‘स्टील फ्रेम’ या पुस्तकात फारुक नाईकवाडे यांनी या पाऊलवाटांचा, त्यावरील चढउतारांचा, पुढे याच पाऊलवाटांतून निर्माण झालेल्या रस्त्याचा, राजमार्गाचा शोध घेतला आहे. हा शोध अतिशय डोळस आणि आश्वासक आहे. 

यशाची एक-एक पायरी सहसा कधीच पुढे येत नाही. यशासाठी झगडणाऱ्यांना हे छोटे टप्पेही असतात, तेच सांगण्याची गरज असते. अशा पायऱ्यांची ओळख ही ‘स्टील फ्रेम’ची मोठी जमेची बाजू आहे.

देशाच्या निर्णयप्रक्रियेवर आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने स्वतःचा ठसा उमटविणारे महाराष्ट्रीयन अधिकारी, त्यांची अधिकारीपदाची कारकीर्द आणि तिथवर पोहोचेपर्यंत त्यांचा संघर्ष, हे सगळे भारतीय समाज, त्याची बलस्थाने, मर्मस्थाने, कॉमन मॅनचे प्रश्न अशा व्यापक कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर चितारण्याचा एक अत्यंत मूलभूत आणि यशस्वी प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

‘स्टील फ्रेम’ हे पुस्तक आज स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ म्हणून सिद्ध झाले आहे. आज राज्यात अभ्यास सुरू करताना प्रत्येक विद्यार्थी ‘स्टील फ्रेम’ वाचून मगच पुढची तयारी करतो. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांना बसायचे प्रमाणसुद्धा वाढले आहे व अनेक विद्यार्थी या परीक्षांत यश मिळवू लागले आहेत. विशेष करून नागरी सेवा परीक्षेविषयी जागरूकता वाढली आहे. याचे श्रेय या पुस्तकाला जाते. 

‘स्टील फ्रेम’नंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक नवी पुस्तके आली; पण त्यात बरीचशी ‘स्टील फ्रेम’ची नक्कल करणारी होती. साहित्य क्षेत्रात ‘स्टील फ्रेम’ने नवा प्रवाह निर्माण केला. ‘स्टील फ्रेम’ या पुस्तकाने एका चळवळीचे काम केले आहे. 

या पुस्तकातील सर्वच यशस्वी अधिकाऱ्यांचे मैत्र लेखक फारुक नाईकवाडे यांना लाभले. डॉ. श्रीकर परदेशी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, अभिनय कुंभार आणि इतर ११ अधिकाऱ्यांच्या यशोगाथा हा या पुस्तकाचा विषय आहे. त्यांची वाटचाल, त्यातील छोटे-छोटे टप्पे त्यांना अगदी जवळून पाहता-अनुभवता आले म्हणूनच या लेखनातील अनुभव अस्सल आहेत आणि ते खूप भावणारे आहेत. 

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्यात कोणत्या संधी उपलब्ध असतात, मराठी तरुण यात काय मर्दुमकी गाजवत आहेत, त्यांच्या पूर्वायुष्यातील संघर्ष केवढा खडतर आहे, त्यांची जिद्द किती अभंग आहे अशा अनेक गोष्टींची ओळख या पुस्तकात होते. प्रयत्नवंतांच्या कथांत, अनुभवांत जिद्दीचा अंगार पेटविण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे. हीच लेखकाच्या शैलीची विशेषता आहे.

(फारुक नाईकवाडे यांचे ‘स्टील फ्रेम’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZYECI
Similar Posts
‘यूपीएससी’चा गुगल सर्च - आयएएस मंत्रा ‘यूपीएससी’ची एबीसीडी ते आयएएसपर्यंतच्या परिपूर्ण तयारीचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड म्हणून सिद्ध झालेले पुस्तक म्हणजे राष्ट्रचेतना प्रकाशनाचे ‘आयएएस मंत्रा.’ फारुक नाईकवाडे आणि रोहिणी शहा यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अल्प परिचय...
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
करोनानंतरच्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थिकेंद्री बनेल : डॉ. अभय जेरे पुणे : ‘करोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थिकेंद्री होईल. प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्रकुशल विद्यार्थी देशाला हवे असून, त्याकडे लक्ष द्यावे लागेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदितांना नोकऱ्यांसंदर्भात मार्गदर्शन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत वेबिनार पुणे : करोनाच्या साथीमुळे उद्धवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. पदवी घेऊन करिअर सुरू करण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना, नवी नोकरी कशी शोधायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language